वॉशिंग्टन – अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष देशांत कोणत्याही कागदपत्राशिवाय राहणाऱ्या एक कोटी 10 लाख स्थलांतरीतांना नागरिकत्व देण्यासाठी आराखडा बनवत आहेत. त्यात भारतातून आलेल्या पाच लाख नागरिकांचा समावेश आहे.
बिडेन यांच्या प्रचार समितीने जारी केलेल्या धोरणात्मक कागदपत्रांत याचा समावेश आहे. आपले प्रशासन आधुनिक करून स्थलांतरीतांच्या पुनर्वसनाचा कायदा बनवण्यासाठी बिडेन संसदे समवेत तातडीने कार्यरत होतील. त्यात या स्थलांतरीतांना त्यांच्या कुटुंबियांसह राहता यावे याला प्राधान्य असेल.
कुटुंब आधारीत स्थलांतरीतांना बिडेन प्रशासनाचा पाठींबा आहे. अमेरिकेतील स्थालांतरीतांना नागरिकत्व देताना कुटुंब हा प्राधान्याचा क्रम असेल. त्यामुळे कौटुंबिक व्हिसाच्या कामाचा भार कमी होईल. जगभरातील निर्वासितांचे अमेरिकेत स्वागत करताना दरवर्षी एक लाख निर्वासितांना आश्रय देण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.
काळाने ही आपल्यावर सोपवलेली जबाबादारी आहे. त्यामुळे दरवर्षी किमान 95 हजार निर्वासितांना आश्रय दिला जाईल. लहान मुलांना त्यांच्या पलकांपासून वेगळे करण्याच्या अमानवी कृती होऊ नयेत म्हणून तो कायदा परत लागू करतील, असेही यात नमूद केले आहे.