आबुधाबी –आयपीएल स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात क्वॉलिफायर दोनमधील लढत होत आहे. दिल्ली कॅपिटल्सने सुरुवातीचे काही सामने सोडले तर अत्यंत सुमार खेळ केला असल्याने याही सामन्यात हैदराबादचेच पारडे जड राहण्याची शक्यता जास्त आहे.
हैदराबाद व दिल्ली यांच्यातील लढतीस थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल (टाॅस) हा दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूनं लागला आहे. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
#DelhiCapitals have won the toss and they will bat first against #SRH in #Qualifier2 of #Dream11IPL pic.twitter.com/vtbHRScGeI
— IndianPremierLeague (@IPL) November 8, 2020
दरम्यान, यंदाच्या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या मंगळवारी होणार आहे. आजच्या सामन्यातील विजेत्या संघास मंगळवारी विजेतेपदासाठी मुंबई इंडियन्स संघाशी दोन हात करावे लागणार आहे.