नवी दिल्ली – फिनलॅंडमध्ये सुरू असलेल्या जागतिक वरिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या 94 वर्षांच्या भगवानी देवी डागर यांनी चक्क सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्यांनी ( Bhagwani Devi Dagar ) या स्पर्धेतील 100 मीटर स्प्रिंट प्रकारात हे यश प्राप्त केल्यानंतर जागतिक क्रीडा क्षेत्रानेही आश्चर्य व्यक्त केले आहे.
94-year-old Bhagwani Devi Dagar won a gold and 2 bronze for India at the World Masters Athletics championships 2022 in Finland, yesterday pic.twitter.com/JRPZrBDSAK
— ANI (@ANI) July 11, 2022
या स्पर्धेत भगवानी देवी यांनी 100 मीटर अंतर 24.74 सेकंदात पूर्ण केले. त्यांनी या स्पर्धेत गोळाफेक प्रकारातही सहभाग घेत ब्रॉंझपदक पटकावले.
India’s 94-year-old #BhagwaniDevi Ji has yet again proved that age is no bar!
She won a GOLD medal at the #WorldMastersAthleticsChampionships in Tampere in the 100m sprint event with a timing of 24.74 seconds.🥇She also bagged a BRONZE in Shot put.
Truly commendable effort!👏 pic.twitter.com/Qa1tI4a8zS
— Dept of Sports MYAS (@IndiaSports) July 11, 2022
केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयानेही आपल्या ट्विटर अकाऊंटवर भगवानी देवींचा फोटो पोस्ट करत त्यांचे अभिनंदनही केले आहे. भगवानी देवींचा नातू विकास डागर हे एक पॅराधावपटू असून त्यांना नुकतेच खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.