वॉशिंग्टन – फिनलंड आणि स्वीडनला नाटोचे सदस्यत्व देण्याला अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने मान्यता दिली आहे. सिनेटमधील 95 सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे दोन तृतीयांश बहुमताची आवश्यक मर्यादा सहज पार झाली.
हा ठराव मंजूर होण्यासाठी केवळ 30 सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता होती. मात्र या ठरावाच्या विरोधात केवळ एका सदस्याने मतदान केले आहे. सिनेटचे बहुमतातील पक्षाचे नेते चक शूमर यांनी दोन्ही राष्ट्रांच्या राजदूतांना मतदानाचे साक्षीदार होण्यासाठी चेंबर गॅलरीत आमंत्रित केले होते.
या ऐतिहासिक ठरावामुळे नाटो कराराप्रती अमेरिकेची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असल्याचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी निवेदनात म्हटले आहे. भविष्यात कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची नाटोची तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ऑक्टोबरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक भारतात
उत्तर युरोपातले हे दोन देश दीर्घकाळपर्यंत आतंरराष्ट्रीय राजकारणात तटस्थ होते. मात्र युक्रेन-रशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ते नाटोत सामील होत आहेत. यापूर्वी फ्रान्सने देखील स्वीडन आणि फिनलंडला नाटोचे सदस्यत्व द्यायला मान्यता दिली आहे. नाटोतील निम्म्यापेक्षा अधिक देशांनी या दोन देशांना नाटोचे सदस्य करून घ्यायला यापूर्वीच मान्यता दिली आहे.
संजय राऊत यांना पाठिंबा दर्शवत प्रियंका गांधी यांचे भाजपवर टीकास्त्र; म्हणाल्या…