मुंबई : धारावीतील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज आणखी 9 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आता धारावीतील करोना रुग्णांची संख्या 189वर पोहोचली आहे. धारावीत आज आढळलेले नवीन रुग्ण हे कुंभारवाड, शास्रीनगर, पीएमजीपी कॉलनी, कुट्टीवाडी आणि तेकडी मस्जीद परिसरातील आहेत.
हे रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. तसेच रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती संबंधित अधिका-यांनी दिली. दरम्यान, धारावीतील 12 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.