कोल्हापूर : कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील कोले मळा परिसरातील एका 60 वर्षीय नागरिकाचा करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या चार वर्षांचा नातूही आज रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या करोनाबाधीताच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना काल तपासणीसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्याठिकाणी घरातील सर्वांची तपासणी करण्यात आली असता रात्री उशिरा हा त्यातील काही रिपोर्ट आले. यामध्ये एका 15 वर्षाच्या नातवाचा रिपोर्ट निगेटिव्ह, तर चार वर्षाच्या नातवाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कालच्या बाधित पत्नीचा व त्यांच्या घरातील अन्य दोघांचा अद्यापही रिपोर्ट येणार आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या आता 11वर पोहोचली आहे.