पुणे – जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 728 करोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात 5 हजार 507 इतके ऍव्टिव्ह रुग्ण आहेत. तर, दिवसभरात 755 रुग्ण बरे झाले आहेत.
ग्रामीण भागात करोनाचे 326 रुग्ण आढळून आले आहेत. तर पुणे शहरात 157, पिंपरी चिंचवडमध्ये 185, नगरपालिका हद्दीत 54 आणि कॅन्टोन्मेंट भागात 6 करोनाचे रुग्ण सोमवारी आढळून आले. तर करोनामुळे 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये पुणे शहरातील 7, पिंपरी चिंचवडमध्ये 3, नगरपालिका हद्दीत 1 आणि ग्रामीण भागात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सोमवारी 14 हजार करोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.