नवी दिल्ली – देशातील तब्बल 7.76 कोटी नागरिकांनी 2022-23 या आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या अनुषंगाने दोन डिसेंबर पर्यंत विवरण पत्रे सादर केली आहेत. या विवरणाची संख्या 31 डिसेंबर पर्यंत आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. 2020-22 या आर्थिक वर्षासाठी दहा कोटी कर दात्यानी विवरण सादर केले होते.
विवरण सादर करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 होती. मात्र विलंब शुल्कासह विवरण 31 डिसेंबरपर्यंत सादर करता येऊ शकते.
ही आकडेवारी पाहता देशातील विवरण दाखल करणार्यांची संख्या वेगाने वाढत आहे.
केंद्र सरकारने विवरण सादर करण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे विवरण दाखल करणार्यांची संख्या वाढत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन 16.63 लाख कोटी रुपये झाले होते. त्यात प्राप्ती कराचा वाटा 8.08 लाख कोटी रुपये होता.