नवी दिल्ली – आतापर्यंत तीन कोटी विवरण सादर केले असल्याची माहिती प्रत्यक्ष कर मंडळाने जाहीर केली आहे. यापैकी 91 टक्के विवरणाची फेर पडताळणी इलेक्ट्रॉनिकली झाली असल्याचेही प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले. गेल्या वर्षी 26 जुलैपर्यंत तीन कोटी करदात्यानी विवरण सादर केले होते.
यावर्षी सात दिवस अगोदरच ही संख्या प्राप्त झाली आहे. त्यामुळे आगामी काळात विवरणाचा वेग वाढेल. प्राप्ती करदात्यानी शक्य तितक्या लवकर विवरण सादर करावे असे आवाहन पुन्हा प्राप्तिकर विभागाने केले आहे. विवरण सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली जाईल या आशेवर करदात्यानी राहू नये आणि शक्य तितक्या लवकर विवरण सादर करावे. त्यामुळे अखेरच्या क्षणी उडणारा गोंधळ कमी होण्यास मदत होईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.