पिंपरी-चिंचवड शहरात 655 करोना रुग्णांची भर

31 रुग्णांचा मृत्यू : 1122 रुग्णांना ‘डिस्चार्ज’

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातील 655 रुग्णांची आज (सोमवारी) भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 70 हजार 827 वर पोहोचली आहे. तसेच 1122 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 11 आणि पालिका हद्दीबाहेरील 20 अशा 31 जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. त्यामध्ये आकुर्डी, भोसरी, थेरगाव, नेहरूनगर, खराळवाडी, प्राधिकरण निगडी, सांगवी येथील 11 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर शहराबाहेरील चाकण, कर्वेनगर, वडगाव, धायरी, वारजे माळवाडी, खराडी, आंबेगाव, खेड, सोलापूर, कराड, जुन्नर, हडपसर, शिंदेवाडी मुळशी, वारजे, पुणे, देहूरोड येथील 20 जणांचा मृत्यू झाला.

शहरात आजपर्यंत 70 हजार 827 जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील 61 हजार 90 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1153 जणांचा तर शहराबाहेरील परंतु महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या 385 अशा 1538 जणांचा आजपर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 6330 रुग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. 1122 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आल्याने आतापर्यंत 61 हजाराहून अधिक रुग्ण करोनामुक्‍त झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.