किव्ह – रशियाच्या सैन्याने जरी खेरसोन शहरातून माघार घेतली असली, तरी हा भाग ताब्यात असताना रशियाच्या सैन्याने येथील नागरिकांवर केलेल्या अत्याचारांचा एक भीषण पुरावा उघड झाला आहे. रशियाच्या सैनिकांनी छळ करून मारून टाकलेले युक्रेनच्या नागरिकांचे 63 मृतदेह आढळून आले आहेत. खेरसोन शहरातल्या “टॉर्चर चेंबर’मध्ये हे मृतदेह सापडले आहेत, असे युक्रेनने म्हटले आहे.
या सर्व मृतदेहांवर अतिशय छळ झाल्याच्या जखमा दिसत आहेत. खेरसोन शहर आणि परिसर गेल्या 8 महिन्यांपासून रशियाच्या ताब्यात होता. या कालावधीमध्ये खेरसोन शहरातील बहुतेक नागरिकांनी पलायन केले होते. जे नागरिक या परिसरात वास्तव्याला होते, त्यांना रशियाच्या सैनिकांच्या अत्याचारांना सामोरे जावे लागले. हे मृतदेह बेवारसपणे आढळून आले आहेत. हे मृतदेह आता सडण्याला सुरुवात झाली असून त्यांची दुर्गंधी पसरायला लागली होती.
स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकार महिलेलाही रशियाच्या सैनिकांनी गेल्या 31 दिवसांपासून डांबून ठेवले होते. तिच्याबरोबर अन्य4 महिलांना जून महिन्यापासून डांबून ठेवण्यात आले होते. त्यांच्याबरोबर अन्य काही जणांना डांबून ठेवले गेले होते. त्यातील पुरुषांना वीजेचे शॉक दिले जात असत.
UNION BUDGET 2023 : भांडवली नफ्यावरील कर आणखी वाढणार? महसूल आणखी वाढविण्याचा….
खेरसोन ताब्यात घेतल्यापासून शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक ठिकाणी अशी “टॉर्चर चेंबर’ करण्यात आली होती, असे या पत्रकार महिलेने युक्रेनच्या सैनिकांना सांगितले आहे.