किव्ह – युक्रेनने रशिया आणि बेलारुसच्या 182 कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत. या कंपन्यांव्यतिरिक्त 3 व्यक्तींवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. रशिया आणि बेलारुसकडून युक्रेनमध्ये होत असलेला संबंध तोडून टाकण्यासाठी युक्रेनचे झेलेन्सकी यांनी हे पाऊल उचलले आहे.
या कंपन्यांची मालमत्ता जप्त करण्यात येईल आणि या मालमत्तेचा वापर युक्रेनच्या संरक्षण दलांसाठी करण्यात येईल, असे झेलेन्सकी यांनी म्हटले आहे. निर्बंध घातलेल्या कंपन्या प्रामुख्याने माल वाहतूक आणि रसायनांच्या उत्पादनांच्या उद्योगात सक्रिय आहेत, असे युक्रेनच्या “नॅशनल सिक्युरिटी ऍन्ड डिफेन्स कौन्सिल’ने म्हटले आहे.
याशिवाय रशियाची पोटॅश खत उत्पादक आणि निर्यात करणारी कंपनी उरालकाली, बेलारुसची सरकारी पोटॅश उत्पादक कंपनी बेलारुस्काली, बेलारुसची रेल्वे आणि रशियातील व्हीटीबी-लिजिंग ऍन्ड गॅझप्रोमबॅंक या वाहतूकदारांना अर्थसाहाय्य करणाऱ्या वित्त संस्थांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
Afghanistan : तालिबानकडून आणखीन एक जाचक निर्बंध; विद्यापीठांमध्ये मुलींना…
रशियाने युक्रेनविरोधातील युद्ध सुरू केल्यापासून युक्रेनने आतापर्यंत रशिया आणि बेलारुसच्या हजारो व्यक्ती आणि कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत.