किव्ह – रशियाच्या हवाई दलाने आज पुन्हा एकदा युक्रेनची राजधानी किव्हवर लढाऊ विमानांमधून बॉम्बफेक केली. या बॉम्बहल्ल्यामध्ये किमान तिघेजण ठार झाले. मे महिन्यात रशियाच्या सैन्याकडून किव्हवर 17 वेळा हल्ले केले गेले होते. यातील बहुतेक हल्ले ड्रोनद्वारे केले गेले होते. आज पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात एका अपार्टमेंटचे आणि एका रुग्णालयाचे नुकसान झाले. या हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या तिघांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांची संख्या वेगवेगळी सांगितली जात आहे. मात्र गेल्या महिन्याभरात झालेल्या अन्य हल्ल्यांपेक्षा आज झालेल्या हल्ल्यातील जखमींची संख्या जास्त असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या हवाई हल्ल्याच्यावेळी एक महिला ठार झाली होती. ही महिला आपल्या घराच्या गच्चीतून विमाने बघत असताना तिच्या घरावर बॉम्ब पडला होता. तेंव्हापासून किव्हमधील नागरिकांनी अशा हल्ल्याच्यावेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा अशी सूचना करण्यात आली आहे.
रशियाने डागलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनना युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने चोख प्रतिकार केला आहे. ही ड्रोन आणि 7ेपणास्त्रे हवेतच पाडण्यात आली. मात्र या क्षेपणास्त्रांचे अवसेष पडल्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आणि काही ठिकाणी आग देखील लागली होती. क्षेपणास्6ांचे अवशेष पडल्यामुळेच काही जणांचा मृत्यू झाला आहे.