482 जणांना डिस्चार्ज
पुणे – शहरात आज सर्वाधिक 4 हजार 38 नमुने घेण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांतील तपासणी अहवालात नव्याने 617 करोनाबाधित सापडले आहे. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 16 हजार 742 पर्यंत पोहोचली. तर दुसरीकडे सर्वाधिक 482 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. आज पाच जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोमवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 9 हजार 929 जण करोनामुक्त झाले आहेत. सद्यःस्थिती शहरातील विविध रुग्णालयांत 6, 195 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 333 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 61 बाधित व्हेंटिलेटरवर आहेत तर 272 बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. एकीकडे बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे क्वारंटाईंची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या 13,0 67 जण क्वारंटाइन आहेत.
महापालिकेच्या 179 कर्मचाऱ्यांना करोना
महापालिकेच्या 179 कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. आता एका उपायुक्त पदावरील अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची चर्चा आहे. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लागण झालेल्या 179 कर्मचाऱ्यांपैकी 12 जणांचा मृत्यू झाला असून, 90 जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये कंत्राटी सेवा देणाऱ्या 44 कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तर, एका कंत्राटीचा मृत्यू झाला आहे. उपचार सुरू असलेल्यांपैकी 66 कर्मचारी हे कायम सेवेतील आहेत. करोनामुक्त झालेल्यांची संख्याही 77 झाली आहे.