सातारा – जिल्ह्यातील ४८ जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने बुधवारी सकाळी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १०९३ झाली आहे.
मंगळवारी रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व करोना केअर सेंटरमध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासातील ३७, प्रवास करुन आलेले ५, सारी ५, आय.एल.आय (ILI) १ अशा एकूण ४८ नागरिकांचा अहवाल करोनाबाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या ४८ जणांमध्ये कराड तालुक्यातील महारुगडेवाडी येथील २१ व ४६ वर्षीय पुरुष, ७५ वर्षीय महिला, रुक्मिणी नगर येथील ३९ वर्षीय पुरुष, तारुख येथील २२, ५४, ३२, ४०, ३५ वर्षीय महिला व ११ वर्षीय युवक व ६०, ४४ वर्षीय पुरुष, तुळसण येथील ३ वर्षाची बालिका, शनिवार पेठेतीँल २२ व २६ वर्षीय पुरुष, २४, ४५, ७० वर्षीय महिला, ओंड येथील ३६ वर्षीय पुरुष. मलकापूर येथील ३६, ३४ वर्षीय पुरुष व १८वर्षीय युवती.
पाटण तालुक्यातील नवसरी येथील १५ व १७ वर्षीय युवक तसेच ३६ वर्षीय महिला, पालेकरवाडी येथील ५० वर्षीय पुरुष, सदा दाढोली येथील ११ व २९ वर्षीय महिला व ४ वर्षाची बालिका. सातारा तालुक्यातील नागठाणे येथील ४५ वर्षीय महिला, रविवार पेठ येथील ३९ वर्षीय पुरुष. माण तालुक्यातील खडकी पाटोळे येथील ६२ वर्षीय पुरुष. खटाव तालुक्यातील निमसोड येथील ६८ वर्षीय महिला, कन्नवडी मायणी येथील ७५ वर्षीय् पुरुष, राजाचे कुर्ले येथील ३३ वर्षीय पुरुष.
कोरेगाव तालुक्यातील करंजखोप येथील ८ वर्षीय बालिका. खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील २२, २४, ३२, २५ वर्षीय पुरुष व १९ व ४९ वर्षीय महिला. फलटण तालुक्यातील कुरवली येथील ४ वर्षीय बालक, कोरेगाव येथील ५ वर्षीय बालक, जाधववाडी येथील ४३ वर्षीय पुरुष, आंदरुड येथील ३५ वर्षीय पुरुष, गुणवरे येथील ५१ वर्षीय पुरुष. जावळी तालुक्यातील मार्ली येथील ८२ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.