वरकुटे मलवडी, ( प्रतिनिधी)- वरकुटे मलवडीमध्ये (ता. माण) माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी धावता दौरा केला. माढा लोकसभेसाठी महायुती व मविआ यांच्यात चुरसीची लढत आहे.
त्यामुळे प्रत्येक उमेदवार पायाला चंग लावून फिरत आहेत. वरकुटे मलवडीतील या दौऱ्यात धैर्यशील मोहिते पाटील यांचा काँग्रेस पक्षाच्यावतीने सत्कार करण्यात आला. धैर्यशील मोहिते पाटील यांना वरकुटे मलवडी पंचक्रोशीतुन मताधिक्य देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे माण तालुका उपाध्यक्ष देवानंद जगताप, माजी सभापती विजय बनसोडे, युवा नेते बाळासाहेब आटपाडकर, भागवत पिसे, शहाजी ढेरे, उद्योजक सुभाष जगताप, सद्दाम मुल्ला यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.