इराणकडून भारताला जादा क्रूड तेलाचा पुरवठा
नवी दिल्ली, दि. 5 – इराणने भारताला जादा क्रूड तेलाचा पुरवठा देऊ केला आहे. तेल निर्यात करणार्या देशांना मिळणार्या दरानेच हे कू्रड तेल इराण भारताला देईल. भारताच्या पूर्व किनार्यावरील अॅल्यूमिनियमचा प्रकल्प, त्रिपुरातील पेपर व राजस्थान कॅनालचा दुसरा टप्पा या सर्व प्रकल्पांना अर्थ साहाय्य करण्यासाठी अथवा त्यात सहभागी होण्यासाठीच इराणच्या शहांनी जादा क्रूड तेलाचा पुरवठा देऊ केला आहे. या तेलाची किंमत समसम पद्धतीने देता येईल तसेच ते कर्जाऊ स्वरूपाचे राहील.
आण्विक प्रक्रिया प्रकल्प ः फ्रान्स पाकला पुरविणार
इस्लामाबाद – पाकिस्तानला आण्विक प्रक्रियेचा प्रकल्प देण्याचा शब्द फ्रान्स पाळणार आहे. तसेच त्यासाठी उशीरही केला जाणार नाही, असे पाक सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले. अमेरिका पाकला अशा स्वरुपाची मदत करणार होती. तथापि, काही वाद निर्माण झाले. त्यामुळे ए-7 व्हॉट कॉन्व्हेट लाइट अॅटक एअरक्राफ्ट सारखी साधनेही अमेरिकेने देण्याचे थांबविले.