पुणे – आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते व आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांच्या हस्ते रुद्रपूजनाने ज्ञान-भक्ती -संस्कृतीचा महोत्सवाला सोमवारी सायंकाळी प्रारंभ झाला.
आळंदीजवळील मरकळ येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या त्रिवेणी आश्रमात गुरूवारपर्यत हा सत्संग व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवणारा सोहळा चालणार आहे.
श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते सोमवारी पार पडलेल्या रुद्रपूजन सोहळ्याला जवळपास दहा हजार नागरिक उपस्थित होते.