न्युयॉर्क – अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील सॅन अँतोनिओ येथे रस्त्यावर बेवारस सोडून दिलेल्या एका ट्रक मध्ये 46 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी या ट्रकचा ताबा घेऊन तपास केला असता त्यात काही जीवंत माणसेही आढळून आली आहेत.
अशा 16 जणांना वाचवण्यात आले आहे. त्यात चार मुलांचाहीं समावेश आहे. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाचवण्यात आलेले सर्वच जण तापाने फणफणलेले आढळून आले असून त्यांची प्रकृती एकूणातच गंभीर असल्याचे सांगण्यात येते.
या ट्रक मधून मेक्सिकोमधील बेकायदेशीर निर्वासितांना अमेरिकेत घुसवले जात होते. घुसखोर नागरीक या ट्रक मध्ये मोठ्या संख्येने दाबून बसवण्यात आल्याने त्यांच्यातील बहुतेकांचा गुदमरून मृत्यू झाला असावा असे सांगितले जात आहे.