वॉशिंग्टन – कोविड कालावधीमध्ये डबघाईला आलेल्या उद्योग आणि बेरोजगार झालेल्यांना मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोविड रिलीफ फंडातून 100 अब्ज डॉलरची चोरी झाल्याचे अमेरिकेतील गोपनीय सेवा विभागाने म्हटले आहे.
सिक्रेट सर्व्हिस आणि लेबर डिपार्टमेंटने उपलब्ध करून दिलेल्या डाटाच्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे. कोविड रिलीफ फंडाचे राष्ट्रीय समन्वयक रॉय डॉस्टन यांनी ही माहिती दिली आहे. अमेरिकेतील जस्टीस डिपार्टमेंटने कोविड रिलीफ फंडात झालेल्या गैरव्यवहाराबोबतच्या प्रकरणांचा समावेश यामध्ये नाही.
एकूण 3.4 लाख कोटी डॉलरच्या मदत निधीमध्ये 3टक्क्यांची तफावत आढळते आहे. करोना सदत निधीच्या लाभ कार्यक्रमात ही तफावत आढळते आहे. या मदत निधीतील मोठ्या रकमेचा गुन्हेगारांना मोह झाला असल्याचे डॉस्टन यांनी म्हटले आहे.
या करोना निधीतील बहुतेक निधीचा गैरव्यवहार बेरोजगार झालेल्या तरुणांसाठीच्या निधीत झाला आहे. बेरोजगारांसाठीच्या निधीतून 87 अब्ज डॉलरच्या निधीचे वाटप अयोग्य प्रकारे वाटप झाले आहे. यातील बराच मोठा निधी चक्क चोरी झाल्याचे लेबर डिपार्टमेंटने म्हटले आहे.
बेरोजगारांसाठीचा विमा आणि कर्ज प्रकरणातील गैरव्यवहाराच्या तपासादरम्यान 1.2 अब्ज डॉलरचा निधी जप्त करण्यात आला आहे. तर व्यवहारांची फेरतपासणी करण्यासाठी 2.3 अब्ज डॉलरचा निधी व्यवहार करणाऱ्या एजन्सींकडे पुन्हा सोपवण्यात आला आहे, असेही सिक्रेट एजन्सीने म्हटले आहे.