तुरुंग हे गुन्ह्याला उत्तर नाही
पॉंडिचरी, दि. 14 – सध्या न्यायाच्या नावाखाली जे चालते ती केवळ भाषेची कसरत आहे, न्याय निश्चित नव्हे, असे उद्गार सुप्रीम कोर्टाचे न्या. व्ही. आर. कृष्णअय्यर यांनी समाजवादी लोकशाही व गुन्हेगारी न्याय या विषयावर बोलताना काढले. न्या. अय्यर यांनी सुनावणीच्या पद्धतीत क्रांतिकारक बदल करण्याची मागणी केली. न्यायपद्धतीतून गुन्हेगार निर्माण होता काम नयेत तर त्यांची सुधारणा झाली पाहिजेत. समाजवादी संस्कृतीचा विवेक निर्माण करण्यासाठी प्रशासक व न्यायमूर्तींना रिफ्रेशर कोर्स दिला पाहिजे. तुरुंग हे काही गुन्ह्याला उत्तर नव्हे. इतर सर्व उपाय थकल्यानंतर पाठवायची जागा म्हणजे तुरुंग!
“माय लॉर्ड’ नको
नवी दिल्ली – न्यायालयांत न्यायाधीशांना उद्देशून “माय लॉर्ड’ म्हणण्याची प्रथा बंद व्हावी असे मत न्या. गोखले यांनी राज्यसभेत व्यक्त केले. ते म्हणाले, ही प्रथा म्हणजे ब्रिटिश राजवटीचा वारसा आहे.
रुपयाची किंमत पुन्हा वाढली
मुंबई – पौंड स्टर्लिंगच्या संदर्भात आज रुपयाची किंमत रिझर्व्ह बॅंकेने 2.82 टक्क्यांनी वाढविली. गेल्या सोमवारी किंमत 2.9 टक्क्यांनी वाढविण्यात आली होती.
गुजराल रशियात राजदूत
नवी दिल्ली – केंद्रीय नियोजन खात्याचे राज्यमंत्री इंद्रकुमार गुजराल यांची नेमणूक रशियात राजदूत म्हणून झाली आहे. त्यांचा दर्जा मंत्र्याचाच राहील.