जातेगाव बुद्रुक येथे कार्यशाळेत नववी, दहावी सुधारित मूल्यमापन प्रशिक्षण
शिक्रापूर-जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील श्री संभाजीराजे विद्या संकुलात पार पडलेल्या नववी व दहावी मूल्यमापन आराखडे व घटकनिहाय गुणविभागणी तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेस शिरूर तालुक्यातील 75 शाळांतील 434 शिक्षकांनी सहभाग घेतला असल्याची माहिती प्रशिक्षण केंद्र संचालक प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली आहे.
24 ते 27 सप्टेंबर या चार कालावधीत नववी व दहावी मूल्यमापन आराखडे व घटकनिहाय गुणविभागणी याबाबत प्रशिक्षण पार पडले.
यावेळी या चार दिवसीय प्रशिक्षणात शिक्षकांना मूल्यमापन पद्धतीत झालेल्या बदलांची माहिती देण्यात आली. या कार्यशाळेत मराठी, गणित, विज्ञान, इतिहास व राज्य शास्त्र, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, भूगोल या विषयांच्या बदललेल्या मूल्यमापन पद्धतीवर विषयतज्ञ रूपाली ढमढेरे, विष्णू मुंजाळे, रमेश सातपुते, दादाभाऊ घावटे, मोहन ओमासे, संतोष परदेशी, सुरेश खैरे, अरूण कोकरे, संजीव मांढरे, सुनिता पिंगळे, किरण झुरूंगे, मनोज नायकवाडी, रावसाहेब थोरात, नितीश पवार, संतोष खताळ यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके यांच्या हस्ते झाले, तर समारोप प्रसंगी प्राचार्य बाबासाहेब गोरे, तुकाराम शिरसाट, एकनाथ चव्हाण, अशोक भोस, सुभाष कोथंबीरे, तसेच सोमनाथ भंडारे यांसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक कांतीलाल धुमाळ, शंकर भुजबळ, रमेश जाधव, अनिता लंघे, प्रिया उमाप यांनी विशेष परिश्रम घेतले.
- नववी व दहावी नवीन मूल्यमापन पद्धतीत शिक्षण ही आनंददायी प्रक्रीया बनली आहे. सुजाण आणि सक्षम विद्यार्थी जडण घडण, प्राप्त ज्ञानाचे उपयोजन कसे करावे, आकलनशक्ती, सृजनशीलता व विचारशक्तीला वाव देणारी नवीन मूल्यमापन पद्धती विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना उपयुक्त आहे.
-रामदास थिटे, प्राचार्य श्री संभाजीराजे विद्यामंदिर जातेगाव