सातारा – जिल्ह्यातील ४३ जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ११८८ झाली आहे.
जावळी तालुक्यातील एका करोनाबाधिताचा म्रुत्यू झाला आहे.
गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व करोना केअर सेंटरमध्ये येथे उपचार घेत असलेल्यांमधील निकट सहवासातील ३४, प्रवास करुन आलेले ३, सारी ४, आरोग्य सेवक १ अशा एकूण ४२ नागरिकांचा अहवाल करोनाबाधित आले असून यामध्ये २४ पुरुष व १८ महिलांचा समावेश आहे.
जावळी तालुक्यातील रामवाडी येथील ५८ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या ४२ जणांमध्ये कराड तालुक्यातील तारुख येथील ६० वर्षीय महिला व ४० वर्षीय पुरुष, कोरीवळे येथील ८ वर्षीय बालक, नडशी येथील ३३ वर्षीय महिला, हजारमाची येथील ३५ वर्षीय महिला, गोळेश्वर येथील १२ वर्षीय युवक व ३६ वर्षीय महिला, कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ३२ वर्षीय महिला डॉक्टर.
पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील १८ वर्षीय युवती
माण तालुक्यातील कोळेवाडी येथील ३६ वर्षीय पुरुष, खडकी येथील ७५, ४२ वर्षीय महिला व १७, १५, २२,५३ वर्षीय पुरुष.
फलटण तालुक्यातील आदंरुड येथील ५२ वर्षीय पुरुष
जावळी तालुक्यातील करहर येथील ५२ वर्षीय् महिला, ७ वर्षीय बालक, रामवाडी येथील १५, १९, ७०, २६, २३ वर्षीय महिला व १२, ४८, ५८, ६०, २७ वर्षीय पुरुष, मुनावळे येथील ४२ वर्षीय पुरुष
कोरेगाव तालुक्यातील जांब खुर्द येथील ३१ वर्षीय पुरुष, जिहे येथील १९, ४७ वर्षीय पुरुष व ६२, ६० वर्षीय महिला, दुर्गळवाडी
येथील २३ वर्षीय पुरुष,
सातारा येथील भंडारी प्लाझा, गोडोली येथील ३२ वर्षीय पुरुष, रविवार पेठेतील ५८ वर्षीय महिला, यादोगोपाळ पेठ येथील २७ वर्षीय महिला, प्रतापगंज पेठेतील ४६ वर्षीय पुरुष, कोडोली
येथील ७५ वर्षीय पुरुष
खटाव तालुक्यातील पडळ येथील ५५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
एका बाधिताचा मृत्यु
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात मुंबई येथून प्रवास करुन आलेला जावळी तालुक्यातील रामवाडी येथील ५८ वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या रुग्णास मधुमेह व अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
घेतलेले एकुण नमुने १३९७२
एकूण बाधित ११८८
घरी सोडण्यात आलेले ७५७
मृत्यु ४९
उपचारार्थ रुग्ण ३८२