निर्बंध कडक : पुण्यात 42 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र, वाचा यादी

पुणे : शहरातील वाढत्या करोना रूग्ण संख्येला अटकाव करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून नव्याने बाधित होणाऱ्या रूग्णांची संख़्या वाढणाऱ्या शहरातील 42 सोसायटया मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून निश्चित केल्या आहेत. शहरातील 15 मधील 10 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील ज्या सोसायटयांमध्ये 20 पेक्षा अधिक व इमारतीत 5 पेक्षा अधिक नवीन बाधित रूग्ण सापडतात अशा सोसायटयांचा यात समावेश आहे.

 

 

शहरात 9 फेब्रुवारी पासून नव्याने करोनाबाधित रूग्णांचा आकडा लक्षणीय वाढला असून दैनंदिन रूग्णसंख्या 700 च्या वर गेली आहे. त्यामुळे शहरात मर्यादीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याच वेळी करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी दोन आठवडयांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात ज्या भागात करोना रूग्ण वाढत आहेत.

 

असे भाग निश्चित करून ते मायक्रो कंटेन्मेंट झोन करून त्याठिकाणी काही प्रमाणात नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पालिकेकडून शहरात सातत्याने रूग्णवाढ सुरू असलेल्या 42 सोसायटया निश्चित केल्या असून त्या ठिकाणच्या नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. त्यात सर्वाधिक 7 सोसायटया हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील आहेत.

 

बाहेरील नागरिकांना आत जाण्यास मनाई

या कंटेन्मेंट झोन करण्यात आलेल्या सोसायटीत बाहेरून जाणाऱ्या नागरिकांना मनाई करण्यात येणार आहे. तसेच या सोसायटयांच्या बाहेर बॅरेकेडस लावण्यात येणार असून बाधित घरांमधील नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात येणार आहे. या शिवाय, सोसायटींच्या नागरिकांची बैठक घेऊन त्यांना याबाबत कल्पना देऊन एकत्र येण्यास मनाई केली जाईल. तसेच या सोसायटयांचा कचरा पालिकेकडून स्वतंत्रपणे त्याची विल्हेवाट लावली जाईल. तसेच ज्या घरात कोणीही बाधित नसतील त्यांना दैनंदिन कामकाजाची मुभा असणार असून त्यांना सुरक्षित वावर ठेऊन सोसायटीत ये- जा करता येणार आहे.

शहरात करोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. त्याचाच, एक भाग म्हणून शहरात 42 मायक्रो कंटेन्मेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत.

– रूबल अग्रवाल ( अतिरिक्त महापालिका आयुक्त)

परिसर आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 

  • शिवाजी नगर – 4
  • सिंहगड रस्ता – 4
  • वानवडी- रामटेकडी -3
  • वारजे- कर्वेनगर – 4
  • हडपसर- मुंढवा – 7
  • कोंढवा-येवलेवाडी 2
  • भवानीपेठ – 5
  • धनकवडी- सहकारनगर – 5
  • बिबवेवाडी -5
  • नगर रस्ता- वडगावशेरी 3

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.