मुंबई : राज्यातील करोना बाधितांच्या संख्येत रोज वाढ होताना दिसत आहे. राज्यात आता ६ नवे करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना बाधितांची संख्या १५९ वर गेली आहे.
6 new #Coronavirus positive cases found in the state today – 5 in Mumbai and 1 in Nagpur. The total number of positive cases in the state rises to 159: Maharashtra Health Ministry pic.twitter.com/OoQuIb1GOq
— ANI (@ANI) March 28, 2020
मुंबईत पाच तर नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आता १५९ झाली आहे. राज्य सरकारच्या आरोग्यखात्याने ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच घरातच थांबा, करोनाला रोखा असे आवाहनही करण्यात आले आहे. तरीही महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे.
सांगलीतील इस्लामपूर भागात काल एकाच कुटुंबातील १२ जणांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती. त्यामुळे इस्लामपूर येथील हा भाग बंद करण्यात आला आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत रुग्ण संख्या १४७ होती. मात्र आता ती वाढून १५९ वर पोहचली आहे.