ब्रजाविले (कॉंगो) – कॉंगोतील लष्कराच्या स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये किमान 37 जणांचा मृत्यू झाला आहे. लष्कराच्या भरतीसाठी युवकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लष्करातील भरतीसाठी स्टेडियमवर चाचणी केंद्र उघडण्यात आले आहे. गेल्या आठवड्याभरापासून या केंद्रावर युवकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. लष्करामध्ये केवळ 1,500 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाते आहे. मात्र दिवसाला 700 जणांची नोंदणी या केंद्रावर केली जाते आहे.
या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये मरण पावलेल्यांची संख्या अंदाजे 37 आहे आणि अनेक जण जखमी झाल्याचे कॉंगोच्या पंतप्रदानांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.