मुंबई – यंदाच्या गणेशोत्सवानिमित्ताने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने 11 स्थानकांसह 35 तात्पुरत्या थांबा आणि विशेष 1 हजार 400 जादा एसटी कोकणासाठी रवाना करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यामुळे गावाकडे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर आणि स्थानकांवरील गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने 19 सप्टेंबर गणरायाचे आगमन होणार आहे. शनिवारी आणि रविवारी सुट्टी, तर सोमवारी हरितालिका आहे. या पार्श्वभूमीवर 16 सप्टेंबरपासून विशेष एसटी मुंबईहून 1 हजार 400 जादा गाड्या कोकणासाठी रवाना करण्यात येणार आहे.
मुंबईतून 535, ठाणे विभागातून 288 आणि पालघर विभागातून 449 अशा एकूण 1 हजार 272 जादा गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले असून ऑगस्टच्या अखेरीस शिल्लक राहिलेले आरक्षण देखील पूर्ण होईल, अशी शक्यता वर्तवली जाते.
तात्पुरते थांबे
मुंबई सेंट्रल – साईबाबा, काळाचौकी, गिरगाव, कफ परेड, काळबादेवी, महालक्ष्मी
परळ – मांगल्य सभागृह, जोगेश्वरी, सेनापती बापट मार्ग दादर
कुर्ल नेहरूनगर – बर्वेनगर, सर्वोदय रुग्णालय, टागोनगर (विक्रोळी), घाटाला (चेंबूर), गुंदवली (अंधेरी), डी. एन. नगर (अंधेरी), सांताक्रूझ (आनंदनगर/शास्त्रीनगर), विलेपार्ले, खेरनगर (वांद्रे), शीव
ठाणे – भांडुप (पश्चिम) व (पूर्व), मुलुंड (पूर्व), भाईंदर, लोकमान्यनगर (ठाणे), श्रीनगर (कळवा-विटावा), नॅन्सी कॉलनी (बोरीवली), मालाड, डहाणूकरवाडी/चारकोप (कांदिवली), महंत चौक (जोगेश्वरी), संकल्पसिद्धी गणेश मंदिर (गोरेगाव)