तळेगाव दाभाडे – वराळे (ता.मावळ) हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात गुरुवार (दि.7) सायंकाळी 35 किलोचा खवल्या जातीचा मासा पकडण्यात आला.
सुनील हिलम (वय 29) यांनी वराळे हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात जाळ्याने पकडला. हा मासा एकट्याला पकडता येत नसल्याने नामदेव वाघमारे, बाळू मुकणे, आत्माराम मुकणे या तिघांनी हा मासा पकडला. तळेगाव दाभाडे मच्छी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणला असता, अनेकांनी माशाचे फोटो काढले, तर काहींनी या माशासोबत सेल्फीही घेतले.
सुनील हिलम म्हणाले, या नदीपात्रात नेहमी लहान मासे सापडतात. 40 किलोचा खवल्या मासा गेल्यावर्षी पकडला होता, एवढे मोठे मासे क्वचितच सापडतात.