शिरूर -शिरूर एसटी बसस्थानकातून सोमवार (दि.15) पासून एसटी बस जिल्हातंर्गत धावणार असल्याची माहिती आगार प्रमुख महेंद्र माघाडे यांनी दिली. पावणे तीन महिन्यापासून लालपरी बंद होती. परंतु आता लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्याने तालुक्यातून लालपरीच्या फेऱ्या पुन्हा प्रमुख रस्त्यांवर दिसणार आहेत.
यावेळी नियमावली बंधनकारक आहे. सोमवारपासून शिरूर तालुका व जिल्ह्यातील काही भागांमध्ये एसटी धावणार आहे. बसस्थानकातून एकूण 28 फेऱ्या विविध भागात जाणार आहेत. जिल्हाबंदी असल्याने शिरूर आगारातील बसेस फक्त जिल्हातंर्गत धावणार आहेत.
वेळापत्रक पुढीलप्रमाणे- सकाळी 6. 30 शिरुर चौफुला, सकाळी 10 वाजता शिरुर- चौफुला, दुपारी 1. 30 शिरुर- चौफुला, संध्याकाळी 5 वाजता चौफुला, सकाळी 8. 15 नारायणगाव, दुपारी 3. 15 वाजता शिंदोडी, सकाळी 8 वाजता वाघोली, दुपारी 12 वाजता वाघोली, दुपारी 1. 30 वाजता वाघोली, सायंकाळी 5 वाजता वाघोली,सकाळी 7 वाजता शिक्रापूर, सकाळी 8 वाजता पाबळ, सकाळी 10 वाजता पाबळ, दुपारी 12 वाजता शिक्रापूर- पाबळ, दुपारी 2 वाजता शिरूर, अशी पहिल्या टप्प्यात 28 फेऱ्या आगारातून होणार आहेत.