फलटण -फलटण तालुक्यात करोना रुग्णांच्या संख्येची “हाफ सेंच्यूरी’ पूर्ण झाली असून वडले गाव हॉट स्पॉट ठरले आहे. आजअखेर येथे करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10 इतकी झाली असून अजूनही संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. वडले येथील एकजणाचा रिपोर्ट 12 जून रोजी करोना पॉझिटिव्ह आलेला असून या युवकांच्या संपर्कात अनेकजण आलेले आहेत त्यामुळे वडले गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बाधित वाढण्याची शक्यता आहे.
फलटण तालुक्यात आज रोजी 32 जण बाधित असून आजपर्यंत बरे झालेले रुग्ण 14 आहेत. आजपर्यंत करोनामुळे चौघांचा मृतूयू झाला आहे. त्यामुळे एकूण करोना रुग्णांची संख्या 50 झाली आहे. वडले येथे करोना पॉझिटिव्ह संख्या 10 झाली असल्यामुळे ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि.10 जून रोजी घेण्यात आलेल्या वडले येथील बाधित व्यक्तीच्या संपर्कातील वर्षीय पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा तेथील करोना पॉझिटिव्हची संख्या 4 झाली होती. नंतर वडले येथील प्रथम पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील दि. रोजी घेण्यात आलेल्या एकाच कुटुंबातील 1 स्त्री, 2 पुरुष, 2 मुले अशा पाच व्यक्तींच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. काल वडले येथील स्थानिक पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकट संपर्कातील एका 25 वर्षीय युवकाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.