नवी दिल्ली – इराण मध्ये अडकलेल्या 276 भारतीयांना करोनाची बाधा झाल्याची माहिती केंद्र सरकारच्यावतीने आज देण्यात आली. विदेश व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी आज लोकसभेत सांगितले की संयुक्त अरब अमिरातीतील 12 जणांना आणि इटालित असलेल्या 5 भारतीयांनाही याची बाधा झाली आहे.
हॉंगकॉंग, कुवेत, रवांडा आणि श्रीलंकेतीलही प्रत्येक एक भारतीय नागरीक या विषाणुंनी बाधित आहे. इराण मध्ये असंख्य भारतीय अडकून पडले होते पण त्यांच्यातील अनेकांना पुन्हा भारतात आणण्यात आले आहे. इराणमधून सुटका करण्यात आलेल्या भारतीयांची एकूण संख्या 389 इतकी आहे. जगातल्या ज्या देशांमध्ये करोनाची मोठी लागण झाली आहे त्यात इराणचा समावेश असून तेथे आत्तापर्यंत 14 हजार जणांना याची बाधा झाली असून 700 जणांचा त्यात बळी गेला आहे.