डोनाल्ड ट्रम्प यांची रिपब्लिकन उमेदवारी निश्‍चित

पाठिंबा असलेल्या सदस्यांच्या संख्येची आवश्‍यक आकडेवारी ओलांडली

वॉशिंग्टन : अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे संभाव्य उमेदवार म्हणून निश्‍चित मानले जात आहेत. राष्ट्रीय पातळीवरील एकूण सदस्यांच्या संख्येच्या तुलनेत उमेदवारी मिळवण्यासाठी आवश्‍यक सदस्यांचे पाठबळ ट्रम्प यांना फ्लोरिडा प्रांतातून मिळाले आहे.

देशभरातील पाठिंबा असलेल्या सदस्यांच्या आकडेवारीनुसार ट्रम्प यांन 1,330 सदस्यांचा पाठिंबा मिळाला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या इच्छुक उमेदवाराला देशभरातील 2,550 प्रतिनिधींपैकी 1,276 सदस्यांचा पाठिंबा मिळणे आवश्‍यक असते.

हा टप्पा ट्रम्प यांनी ओलांडला असल्यामुळे त्यांची उमेदवारी निश्‍चित आहे. रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवाराची औपचारिक घोषणा ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये करण्यात येणार आहे.

फ्लोरिडा या स्वतःच्या प्रांतातच पुरेसे पाठबळ ट्रम्प यांना मिळाले आहे. त्यामुळे प्रायमरीतील त्यांचा विजय निश्‍चित आहे, असे ट्रम्प यांच्या प्रचार विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. प्रायमरीतील मतांची टक्केवारी आणि एकूण मतांच्या संख्येबाबत ट्रम्प यांनी नवीन विक्रम प्रस्थापित केल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.

आतापर्यंत प्राथमिक फेरीतल्या राज्यांमधील एकूण मतमोजणीत ट्रम्प यांनी मागील विक्रमांपेक्षा कमीतकमी 40 लाख मते अधिक मिळविली आहेत. याच राज्यांमधून 1996 मध्ये माजी अध्यक्ष बिल क्‍लिंटन यांनी प्रायमरीमध्ये अधिक मतांचा विक्रम प्रस्थापित केला होता.

ट्रम्प यांनी आतापर्यंत मतमोजणी झालेल्या अलाबामा, आर्कान्सा, कोलोरॅडो, आयोवा, मेन, मॅसाचुसेट्‌स, मिशिगन, मिनेसोटा, मिसिसिप्पी, मिसुरी, न्यू हॅम्पशायर, टेनेसी, टेक्‍सास, उटाह आणि वॉशिंग्टन या राज्यांमधून सर्वाधिक मते मिळवली आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.