वाई – येथील व्यापारी मदनलाल किसनलाल ओसवाल यांची तब्बल 25 लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी, राजस्थानमधील योगेशकुमार राजेंद्र शर्मा याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धर्मपुरी (वाई) येथील व्यापारी मदनलाल किसनलाल ओसवाल (वय 68) यांनी राजस्थानमधील योगेशकुमार राजेंद्र शर्मा याला दि. 8 ऑक्टोबर 2020 ते दि. 18 ऑगस्ट 2023 या कालावधीत 25 लाख 47 हजार 140 रुपयांचा राजमा विकला होता. योगेशकुमारने रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्याने बनावट कंपनीच्या नावे माल मागवून, त्याची परस्पर विल्हेवाट लावत, मदनलाल ओसवाल यांची फसवणूक केल्याप्रकरणी भादंवि कलम 420, 467, 468 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक बिपिन चव्हाण तपास करत आहेत.