पुणे – कात्रज परिसरातील सुदामाता मंदिर परिसरातील बाबाजीनगर भागात मंगळवारी सायंकाळी तब्बल पंचवीस पेक्षा जास्त सिलेंडरचे स्फोटमुळे मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घटली. घटनेची माहिती मिळताच कात्रज अग्निशामक केंद्राबरोबरच कोंढवा आणि भवानी पेठ अग्निशामक केंद्रातील गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली.
स्फोट झालेले ठिकाणी उंचीवर असल्याने आणि गाड्या जाण्यास पुरेसा रस्ता नसल्याने जवळपास दोनशे फुट लांब पाईपच्या साह्याने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक केंद्रातील जवानांना यश मिळाले.
कात्रजमधील गंधर्व लॉ़न्स पासून जाणाऱ्या मार्गावर ही भयानक घटना घडली आहे. सिलेंड़रचे एकापाठोपाठ एक असे स्फोट झाल्यानं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान या घटनेचे वृत्त कळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं आणि आगीवर नियंत्रण मिळवित अजून कुठे लिकेज आहे का याची तपासणी सुरू आहे. या दुर्घटनेत मालक किरकोळ जखमी आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारीही घेण्यात आली आहे.