पुणे विभागात आतापर्यंत 36 हजार 671 जणांना बाधा
13 हजार 342 ऍक्टिव्ह रुग्ण : बरे होण्याचे प्रमाण 60.12 टक्के
पुणे – विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत करोनाबाधितांची संख्या 36 हजार 671 झाली आहे. यातील 22 हजार 48 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडले आहे. तर, ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 13 हजार 342 इतकी आहे. पुणे विभागामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 60.12 टक्के आहे. तर, मृत्यूचे प्रमाण 3.49 टक्के आहे.
पुणे जिल्ह्यात 30 हजार 425 बाधित असून 18 हजार 395 जण बरे झाले आहेत. ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 11 हजार 135 आहे. 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 494 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 60.46 टक्के आहे. तर, मृत्यूचे प्रमाण 2.94 टक्के इतके आहे. सातारा जिल्ह्यात 1 हजार 372 रुग्ण असून 813 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 504 आहे. 55 जणांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात 3 हजार 371 रुग्ण असून 1 हजार 825 जण बरे झाले आहेत. तर, 304 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 520 रुग्ण असून 270 जण बरे होवून घरी गेले आहेत. तर, 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 983 रुग्ण असून 745 जण बरे झाले आहेत. 14 जणांचा मृत्यू झाला.