म्हणून दिला जातो जीन्स मध्ये हा छोटा खिसा

पुणे – आजच्या काळात आपण सगळेच पुरुष किंवा स्त्रिया सर्वच जीन्स घालतात. आरामदाय, चांगला लूक असण्याबरोबर जीन्स टिकाऊ सुद्धा असतात. तुम्ही जीन्स परिधान केली असाल तर समोरच्या खिशात एक लहान खिशाही आहे, जो प्रत्येकाने लक्षात घेतला असेल. तर आज आम्ही तुम्हाला या मिनी पॉकेट मागचा एक इतिहास सांगणार आहोत…

असे म्हणतात की हे मिनी पॉकेट प्रथम 1879 मध्ये लेव्ही स्ट्रॉस नावाच्या कंपनीने सुरू केले होते जे आज आपण सर्व लेव्ही म्हणून ओळखतो. त्या काळी हे मिनी पॉकेट वॉच पॉकेट म्हणून ओळखले जात असे.  विशेषतः काउबॉयसाठी हे पॉकेट डिझाइन केले होते.

अठराव्या शतकात काउबॉय साखळ्यांची लहान घड्याळे वापरत. आणि तेव्हापासून लेव्ही स्ट्रॉसने जीन्समध्ये लहान खिसे बनवायला सुरुवात केली जेणेकरून काउबॉय त्यात आपले लहान आणि साखळीचे घड्याळ अगदी चांगल्या पद्धतीने ठेवू शकत.

घड्याळ छोट्या खिशात ठेवून, ते पडन्याची भीती नव्हती. यासह, आपण त्यात इतर काही लहान गोष्टी ठेवल्या तर त्यामध्ये स्क्रॅच येत नाहीत आणि ते त्याच ठिकाणी राहतात कारण त्यामध्ये फारच कमी जागा असते. त्यामुळे हे  मिनी पॉकेट अतिशय फादेशीर ठरू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.