मुंबई – सावित्रीबाई वसतीगृहातील घटना ताजी असतानाच आता मुंबई मध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्येच मुली सुरक्षित नाहीत. मुंबईतील हार्बर मार्गावर धावणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
ही घडना 15 जून रोजी सकाळी 7.28 च्या सुमारास घडली. पीडित तरुणी परीक्षेला जात असताना तिच्या वर हा प्रसंग ओढावला. दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच 8 तासात अरोपीला बेड्या टोकल्या आहेत. नवाज करीम (40 वर्ष) अस या आरोपीच नाव आहे. तो मुंबईत रोजंदारी करून स्व:तच पोट भरत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह गृहखात्यावर प्रश्न उठवले जात आहेत. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत संपात व्यक्त केला आहे. तसेच सरकारवर निशाना साधला आहे. “संतापजनक.. चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक घटना आहे.
संतापजनक!
चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक घटना आहे.यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता…— Supriya Sule (@supriya_sule) June 15, 2023
यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. या घृणास्पद घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपासयंत्रणांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे.” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.