आवक रोडवल्यामुळे भाववाढ, सभापती ऍड. काळे यांची माहिती
जुन्नर – नवीन कांदा बाजारात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत नसल्यामुळे जुन्नरला कांद्याने शंभरी गाठली असून येत्या काही दिवसांत भाव घटण्याची शक्यता नाही. रविवारी (दि. 24) जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात झालेल्या लिलावात उच्च प्रतीच्या कांद्याला 951 प्रति दहा किलोस भाव मिळाला आहे. येथील लिलावात कांद्याच्या केवळ 1006 गोणी तर 1034 बटाटा गोण्यांची आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती ऍड. संजय काळे यांनी दिली.
ओतूर बाजाराच्या आवारात रविवारी झालेल्या लिलावात 7183 कांदा पिशव्या व 243 बटाटा गोण्यांची आवक झाल्याची माहिती सचिव रुपेश कवडे यांनी दिली आहे. ओतूर येथील लिलावात उच्च दर्जाच्या कांद्यास 101 रुपये (प्रति दहा किलो) मिळाला आहे. कांद्याच्या अनुपलब्धतेमुळे पुढील काही दिवस दर कमी होण्याची चिन्हे नसल्याचे आडतदार सुमित परदेशी यांनी सांगितले. या भावाढीमुळे स्वयंपाक घरात जाणारा कांदा 100 रुपयांच्या पुढे गेला आहे. अनेक हॉटेलमध्ये जेवणासोबत येणाऱ्या कांदा प्लेटचे स्वतंत्र पैसे आकारण्यास सुरुवात झाली आहे. तसेच मिसळ प्लेटसोबत कांदा मर्यादित देत असल्याचे चित्र आहे, तर काही पदार्थांमध्ये कांद्याऐवजी मुळा किंवा कोबीचा वापर
केला जात आहे.
प्रतवारीनुसार मिळालेले बाजारभाव
- गोळा 925 ते 951
- कांदा 900 ते 925
- गुलटी 600 ते 750
- बदला 300 ते 800