बॉलिवुड अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या चित्रपटसृष्टीपासून दुर आहे. मात्र, ती सतत सोशल मीडियावर ऍक्टिव असते आणि आपले फोटो-व्हिडिओ शेअर करत असते. यामुळे ती सतत चर्चेत असते. ईशा खूपच बोल्ड आणि बिंदास आहेत. यामुळेच ती स्वतःचे टोन्ड बॉडीला फ्लॉन्ट करताना घाबरत नाही.
ईशाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात ती डीप नेकलाइन असलेल्या बोल्ड आउटफिटमध्ये दिसते. हा तिचा बोल्ड लुक चाहत्यांना खूपच आवडला आहे.
प्रफेशनल फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास ईशाचे या वर्षात “टोटल धमाल’ आणि “वन डे ः जस्टिस डिलिवर्ड’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान, ती “देसी मॅजिक’ आणि “हेरा फेरी-3′ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. सध्या “हेरा फेरी-3′ चित्रपट काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे, तर “देसी मॅजिक’ पोस्ट प्रॉडक्शनमध्ये आहे.