पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटीत 19 वे स्थान

पिंपरी – स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या विकास कामांच्या आधारावर पिंपरी – चिंचवड शहराला 19 वे स्थान मिळाले आहे. निविदेपासून तर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीपर्यंतचा आढावा घेत गुणांकनाद्वारे स्थान निश्‍चिती करण्यात आली आहे. तर शेजारचे शहर पुणे 11 व्या स्थानी आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत काढण्यात आलेल्या निविदा, मार्किंग, प्रकल्पांतर्गत रस्ते आणि गृहनिर्माण आदींसाठी गुणांकन दिले जातात. याच्याच आधारावर यादी तयार केली जाते. केंद्रीय नगर विकास मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या या यादीमध्ये नागपूर 367.42 गुण मिळवित पहिल्या स्थानावर आहे. तर, दुसऱ्या क्रमांक मिळवणाऱ्या अहमदाबादला 367.36 गुण मिळाले आहे. 344.99 अंकासह सुरत तिसऱ्या क्रमांकावर, 333.9 गुणांसह भोपाळ चौथ्या क्रमांकावर तर 311.65 गुणांसह रांची पाचव्या क्रमांकावर आहे.

त्रिपुरा सहावा, विशाखापट्टणम सातव्या, वडोदरा आठव्या, वेल्लोर नवव्या, अमरावती दहाव्या, पुणे अकराव्या तर कानपूर बाराव्या नंबरवर आहे. स्वच्छतेच्या बाबतीत सर्वात पुढे असलेले इंदौर शहर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत 15 व्या क्रमांकावर आहे. पिंपरी – चिंचवड 19 व्या आणि नाशिक 23 व्या क्रमांकावर आहे. पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या देखरेखीखाली शहरात विविध प्रकल्पांची कामे सुरु आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.