पुणे – शहरात सोमवारी दिवसभरात 1,822 जण करोनामुक्त झाले, तर दिवसभरात नव्याने 782 बाधित सापडले. गेल्या आठ दिवसांपासून शहरातील बाधितांची संख्या कमी, तर करोनामुक्त व्यक्तीची संख्या अधिक वाढत असल्याचे दिसून येते. दरम्यान, आज करोनामुळे 18 जणांचा मृत्यूची नोंद झाली असून मृतांची संख्या 1 हजार 384 वर पोहचली आहे.
शहरात मागील सहा दिवसांत तब्बल 9 हजार 859 जण करोनामुक्त झाले असून, आतापर्यंत 39 हजार 939 जणांनी करोनावर मात केली आहे. तर या सहा दिवसांत 7 हजार 874 बाधित सापडले असून, बाधितांची एकूण संख्या 58 हजार 304 वर पोहचली आहे. दरम्यान, दिवसभरात 4 हजार 604 जणांची तपासणी करण्यात आली आहे.
सध्या, करोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या 16,981 इतकी आहे. त्यातील 633 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 389 जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर 244 बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता यंत्रणा सतर्क असून बेडची संख्या वाढविली जात आहे.