लष्करी जवानाचे दहशतवाद्यांकडून अपहरण?

नवी दिल्ली – ईद निमित्त सुट्टीकाढून काश्‍मिरात गेलेला एक जवान काल रात्रीपासून बेपत्ता आहे. त्याचे दहशतवाद्यांकडून अपहरण झाले असण्याची शक्‍यता लष्कराने व्यक्त केली आहे.

शकीर मंझुर असे या जवानाचे नाव असून तो 162 व्या बटालियनमध्ये रायफलमॅन म्हणून कार्यरत होता. त्याची कार जळालेल्या अवस्थेत सापडली आहे.

कुलगाम जिल्ह्यातील रंभामा येथे ती सापडली आहे. स्थानिक पोलिसांनी प्रशिक्षित श्‍वान पथके आणि ड्रोनच्या सहाय्याने या जवानाचा शोध सुरू केला आहे. लष्करात कायर्रत असलेले जवान घरात परत आले की त्यांना लक्ष्य करण्याचे प्रकार दक्षिण काश्‍मीरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

तेथे या आधी असे तीन ते चार प्रकार घडले आहेत. लष्कराने एक ट्विटर संदेश जारी करून रायफलमॅन शकीर मंझुर याचे अपहरण झाले असावे अशी शक्‍यता व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.