कराची – पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समुदायातील 15 विद्यार्थ्यांवर कट्टर इस्लामिक विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी सोमवारी पंजाब विद्यापीठात हल्ला केला. या घटनेत सुमारे 15 विद्यार्थी जखमी झाले आहेत. हिंदू समाजातील विद्यार्थी होळी साजरी करण्यासाठी विद्यापीठ परिसरात जमले होते.
पंजाब विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये सुमारे ३० हिंदू विद्यार्थी होळी साजरी करण्यासाठी जमले होते. विद्यापीठाचे विद्यार्थी आणि प्रत्यक्षदर्शी काशिफ ब्रोही यांनी सांगितले की, ‘विद्यार्थी लॉ कॉलेजच्या लॉनमध्ये जमले असताना इस्लामी जमियत तुलबा (IJT) च्या कार्यकर्त्यांनी त्यांना होळी साजरी करण्यापासून रोखले, ज्यामुळे हाणामारी झाली आणि या घटनेत 15 हिंदू विद्यार्थी जखमी झाले.’
होळी साजरी करण्याची परवानगी घेण्यात आली
ब्रोही यांनी दावा केला की, ‘होळी साजरी करण्यासाठी त्यांनी विद्यापीठ प्रशासनाची पूर्वपरवानगी घेतली होती. या घटनेत जखमी झालेल्या खेत कुमारने सांगितले की, कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर आयजेटी सदस्यांविरोधात झालेल्या निदर्शनादरम्यान विद्यापीठाच्या रक्षकांनी त्याच्यावरही मारहाण केली होती.