मुंबई – बंगाली सौंदर्य आणि बॉलिवूड अभिनेत्री ‘मौनी रॉय’ ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. मौनीने अनेक टॉप टीव्ही शो केले आहेत. आपल्या अभिनयाने मौनी घरोघरी लोकांच्या मनावर राज्य केले आहे.
तिच्या सौंदर्याने आणि किलर स्टाईलने चाहतेही घायाळ झाले आहेत. मौनी रॉय ही छोट्या पडद्यावरीलच नव्हे तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. मोनी रॉयची मोठ्या पडद्यावरची जादू तिच्या अपेक्षेप्रमाणे चालली नाही ही वेगळी गोष्ट आहे.
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या मौनी रॉयने आता टीव्ही इंडस्ट्रीला अलविदा केला असला तरी टीव्हीच्या जगामध्ये ती अजूनही ओळखली जाते. मौनी रॉयने ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’मध्ये कृष्णा तुलसीची भूमिका साकारून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. दरम्यान, अश्यातच आता अभिनेत्रीने नवीन विश्वात पाऊल टाकले आहे.
नुकताच मुंबईमध्ये मौनी रॉय हिच्या मालकीच्या रेस्टॉरंटचे ओपनिंग झाले आहे. मुंबईच्या अंधेरी भागामध्ये मौनी रॉय हिने ‘बदमाश’ नावाचे रेस्टॉरंट सुरू केले आहे. ज्याचे ओपनिंग नुकतंच झाले आहे.
मौनी रॉय हिने आपल्या रेस्टॉरंटच्या ओपनिंगचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मौनी रॉय ही पती सूरज नांबियार तिच्यासोबत दिसत आहे. तसेच, यावेळी रेस्टॉरंटच्या ओपनिंगला अनेक बॉलिवूड स्टारने हजेरी लावली असल्याचं दिसून आलं.