पुणे – करोनाच्या लढाईत पालिकेला केंद्र सरकारकडून आरोग्यविषयक मदत केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून “पीएम केअर फंड ट्रस्ट’कडून महापालिकेला आतापर्यंत 13 व्हेंटिलेटर्स देण्यात आले आहेत. यातील चार व्हेंटिलेटर्स डॉ. नायडू रुग्णालयात बसवण्यात आले आहेत.
महापालिकेला करोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता भविष्यात आयसीयू आणि व्हेंटिलेटर्स कमी पडतील असा अंदाज आहे. पीएम केअर फंडाकडून भारतामध्ये निर्मित झालेले व्हेंटिलेटर्स सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवण्यात येत आहेत. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 275 व्हेंटिलेटर्स मिळाले आहेत. त्यातील पुण्यात आतापर्यंत 13 व्हेंटिलेटर्स देण्यात आले आहेत. यातील उर्वरित नऊ व्हेंटिलेटर्स लायगुडे दवाखान्यात बसवण्यात येणार आहेत.