सोरतापवाडी -कोरेगाव मुळ (ता. हवेली) गावातील पहिला करोना रुग्ण सोमवारी (दि. 25) आढळून आला आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील 12 व इतर 1 अशा 13 व्यक्तींना तपासणीसाठी मंगळवारी (दि. 26) शासकीय रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले असून 8 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले असल्याची माहिती उरुळीकांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम यांनी दिली.
बाधित रुग्णाच्या राहत्या घरापासून अर्धा किलोमीटर परिसर ग्रामपंचायतीने सील केला आहे. उरुळी कांचन आणि परिसरामध्ये गेल्या महिनाभरात कुठल्याही पद्धतीने रुग्णांमध्ये वाढ झाली नव्हती; परंतु कोरेगाव मूळमध्ये नव्याने बाधित झालेल्या या रुग्णामुळे परिसरावर करोनाचे संकट पुन्हा गडद होताना
दिसत आहे.