नारायणगाव – किल्ले शिवनेरीवर दीपोत्सव साजरा करून नारायणगाव येथील शिवजन्मभुमी सायकलवारीच्या वतीने नारायणगाव ते शिर्डी सायकलवारीत 125 जणांनी सहभाग घेतला, अशी माहिती आयोजक धनंजय माताडे यांनी दिली. सायकलवारीचे हे तिसरे वर्ष होते. यावेळी यश विजय ताजणे हा 13 वर्षीय सायकलपटू “मॅन ऑफ द सायकलवारी’ ठरला.
साईभक्त धनंजय माताडे यांच्या संकल्पनेतून आणि ओम साई सेवा मंडळ नारायणगावाच्या यांच्या सहकार्याने सुरू आसलेल्या या सायकल वारीचा शुभारंभ आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, संतोष खैरे, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, हभप सुरेखा शिंदे, साई सेवा मंडळाचे अध्यक्ष रसाळ, सदानंद खैरे, शिवाजी बोऱ्हाडे, सचिन दरेकर, हरिओम ब्रह्मे, सुधीर मुंढे, प्रदीप थोरवे, सूरज वाजगे, सुनील भुजबळ, मकरंद पाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुक्ताई देवस्थान ट्रस्ट, नारायणगाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने नारायणगाव शहरातून श्री गणेश मित्र मंडळ, शेटे मळा यांनी ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. पूर्व वेशीत शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. प्रल्हाद राऊत यांनी प्रत्येक सायकलस्वारांचा दोन दिवसांचा 1 लाख रुपयांचा विमा उतरविण्यासाठी मदत केली.
सायकलवारीत तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी उद्योजक प्रशांत सुभाष गुंजाळ यांच्याकडून 11 हजारांची सायकल 61 वर्षीय सायकलस्वार शंकर कचरे यांना शिर्डीचे नगरसेवक अशोक गोंधकर यांच्या उपस्थिती
देण्यात आली.