सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात 11 करोनाबाधितांचा मत्यू झाल्याची माहिती मंगळवारी सकाळी देण्यात आली. तर नवीन 290 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 7,883 झाली आहे. तर करोनाच्या बळींची संख्या 260 वर पोहचली आहे.
रिपोर्टनुसार, 290 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, तर 11 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
11 कोरोनाबाधितांचा मृत्यू
क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात सरताळे (ता. जावळी) येथील 56 वर्षीय महिला, बुधवार पेठ कराड येथील 48 वर्षीय महिला, गोडोली सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, नेले (ता. सातारा) येथील 75 वर्षीय महिला, फलटण येथील 60 वर्षीय महिला व राजेवाडी निगडी (ता. सातारा) येथील 70 वर्षीय पुरुष अशा एकूण सहा बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच कराड येथे खासगी रुग्णालयात आंबेडकरनगर पाटण येथील 69 वर्षीय पुरुष, वाई येथील खासगी रुग्णालयात महाबळेश्वर येथील 80 वर्षीय पुरुष व सातारा येथील खासगी रुग्णालयात महाबळेश्वर येथील 51 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, घिगेवाडी ता. कोरेगांव येथील 64 वर्षीय पुरुष अशा एकूण पाच करोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकूण 11 करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.
घेतले एकूण नमुने – 36687
एकूण बाधित – 7883
घरी सोडण्यात आलेले – 4223
मृत्यू – 260
उपचारार्थ रुग्ण – 3400