बॉबी देओलचा “क्लास ऑफ 83′ या महिन्याच्या अखेरीस रिलीज होणार आहे. मात्र त्याबाबत सध्या संदिग्धतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या सिनेमाच्या पूर्वार्धामध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना दाखवण्यात आले आहे. यावरून प्रदीप शर्मा यांनी निर्मात्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
शाहरुख खानच्या रेड चिली एन्टरटेनमेंट प्रा. लि., नेटफ्लिक्स एन्टरटेनमेंट सर्व्हिस इंडिया लिमिटेड
आणि सैय्यद हुसैन जैदी यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी
आपल्याला दाखवला जावा. अन्यथा हायकोर्टातून या सिनेमाच्या रिलीजला स्टे आणला जाईल. एवढेच
नव्हे तर निर्मात्यांविरोधात सिव्हील आणि क्रिमिनल केस देखील दाखल केली जाईल, असे शर्मा यांनी
आपल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे.
“क्लास ऑफ 83’मध्ये आपल्याला अथवा आपल्या बॅचच्या पोलीस अधिकाऱ्यांना वाईट पद्धतीने
दाखवण्यात आले नसल्याची खात्री झाल्याशिवाय हा सिनेमा आपण रिलीज होऊ देणार नाही, असे शर्मा यांचे म्हणणे आहे.
“क्लास ऑफ 83′ नावाचे एक पुस्तकदेखील गेल्या वर्षी प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक एन्काउंटर
स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावर आधारलेले आहे. या सिनेमामध्ये बॉबी देओल बरोबर अनुप सोनी,
विश्वजीत प्रधान, जॉय सेनगुप्ता हे महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहेत.