मुझफ्फरनगर : सुधारीत नागरीकत्व कायदा विरोधी (का) झालेल्या आंदोलनात मदरशामधून अटक करण्यात आलेल्या मुलांना जामीन मंजूर करण्यात आला. त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 20 डिसेंबरपासून ही मुले गजाआड होती.
या मुलांविरोधात कोणाताही पुरावा नसल्याच्या विशेष तपास पथकाच्या अहवालाआधारे हा जामीन मंजूर केला. ही मुले कोणत्याही गंभीर गुन्ह्यात सहभागी झाली नव्हती, असे या अहवालात म्हटले आहे. तसेच त्याच्यावरील प्रतिबंधात्मक आदेश मोडल्याचे वगळता अन्य सर्व आरोप मागे घेण्यात आले आहेत.
विशेष तपास पथकाच्या पडताळणीत निर्दोष आढळलेल्या 18 जणांची सुटका करण्यात आली आहे. सुमारे 70 जणांना या आंदोलनात अटक करण्यात आली होती.